Explore
Sign Up
Login
June 14, 2020
 

गहाण.

ठेवीला प्राण गहाण.
मातृभूमी साठी जाण.
तमा न बाळगे समोर कोण.
शत्रुचे आम्ही उपसून काढतो प्राण.

मातृभूमी समोर सर्व कस्पटा समान.
रणांगणात अंगदा समान
उभे राहतो पाय रोवून.
न येऊ कदापि रणांगण सोडून.

मातृभूमीची आनबान.
प्रिय आम्हा आमच्या प्राणांहून.
मातृभूमीच आमची शान.
मातृभूमीतच असे आमची जान.

दाखव कोण आहे आमच्या समान.
मातृभूमी जिची लेकरे आमच्या समान.
मातृभूमीची सेवा हाच आमचा मान सन्मान.
आमच्यासाठी तिची सेवा हेच कर्म महान.

- संजय उदगीरकर.

SIMPLICITY DAY
Thumb_1573266478
PO#284397
0
0
June 14, 2020
 

इथे.

इथे कोण कोणाचे ऐकतो आहे.
मनाला जे येईल ते तो करतो आहे.
अडला नारायण गाढवाचे पाय धरी हे धोरण आहे.
आपल्या पोळीवर तुप ओढण्याचा सर्व खेळ आहे.

इथे कोण कोणाचे ऐकतो आहे.
धर्माचा व्यापार आणि व्यापारच धर्म झाला आहे.
पदोपदी सत्य आणि असत्य आपली व्याख्या बदलत आहे.
माणूस वरून अनादी काळापासून तसाच असला तरी आतून क्षणा क्षणात बदलत आहे.

इथे कोण कोणाचे ऐकतो आहे.
मोठ्या घराचा पोकळ वासा आहे.
ज्याला जे मिळाले ते तो घेऊन पळतो आहे.
जो तो आपला खिसा भरतो आहे.

इथे कोण कोणाचे ऐकतो आहे.
सगळा बोंगळ कारभार आहे.
खोट्याचा खरे असण्याचा दिखावा आहे.
मारणाराच मार खाल्लेल्यापेक्षा मोठ्या आवाजात रडतो आहे.

मंत्र थोडा आणि थुंकाच जास्त आहे.
धड्डाची लेखणी सव्वा हात तशी इथली गत आहे.
कायदे तयार करण्याचा खेळ आहे.
अम...

SIMPLICITY DAY
Thumb_1573266478
PO#284397
0
0
June 14, 2020
 

जय हिंद।

मानो या ना मानो अभी जिंदा है हम ।
नजदीक आके देखो, सांस ले रहे है हम ।
धीमी धीमी ही सही हरक़त कर रहे है हम ।
यकीन करो के जिंदा है हम ।

मारने जो आये थे उन सबको मार चुके है हम ।
थक गये है लेकिन जिंदा है हम ।
जंग के मैदान मे गिरे हुए है हम ।
लहू की गुठलियों को जिस्म से नोच रहे हम ।

मत सोंचो के चंद सांसों के मेहमान है हम ।
मौत को शिकस्त देके औंधे पडे है हम ।
अपने ही जिस्म से बहता लहू देख रहे है हम ।
दुश्मनों के इंतज़ार मे अब भी है हम ।

मौत को भी इंतज़ार करा रहे है हम ।
खुन बहा कर मादरे वतन का कर्ज चुका रहे है हम ।
मा के गोद मे लेट कर मा पे जान न्योछावर कर रहे हम ।
जख्म से भरा जिस्म है पर जय हिंद बोल रहे है हम ।

- संजय उदगीरकर ।

SIMPLICITY DAY
Thumb_1573266478
PO#284397
0
0
May 8, 2020
 

घुम फिर के।

घुम फिर के फिर वोही पुराने दिन आ गए ।
हमारे घर मे हम मेहमान हो गए ।
गुलाम सारे आका हो गए ।
जिन पर हमारे अहसान है वोह सब फरामोश हो गए ।।

घुम फिर के फिर वोही पुराने दिन आ गए ।
न जाने कब ओर कैसे कुत्ते सारे शेर हो गए ।
शेरों के दुम दबा के भागने के दिन आ गए ।
जो बेईमान थे रातोरात ईमानदार हो गए ।।

घुम फिर के फिर वोही पुराने दिन आ गए ।
हमारे जमीन पे आज हम बोझ हो गए ।
जो असल मे बोझ हे आज वो जमींदार हो गए ।
कातिलो को हम अपने कांधों पे ढोने मजबूर हो गए ।।

घुम फिर के फिर वोही पुराने दिन आ गए ।
लफ़्ज़ों के मायने ही बदल गए ।
चोर सारे साहू हो गए ।
साहू चोरों के गुलाम हो गए ।।

घुम फिर के फिर वोही पुराने दिन आ गए ।

- संजय उदगीरकर।

SIMPLICITY DAY
Thumb_1573266478
PO#284397
0
0
May 4, 2020
 

मी सहसा.

मी सहसा कोणाच्या वैयक्तिक बाबतीत नाक खूपसत नाही.
सहजच कानावर काही पडले तर ऐकायचे सोडत नाही.
फुकट करमणूक होत असेल तर तिथे रमायचे सोडत नाही.
आपण होऊन होत असलेले भांडण सोडवत नाही.

मी सहसा कोणाच्या वैयक्तिक बाबतीत नाक खूपसत नाही.
तसे करायची इच्छा खूप आहे पण करण्यासाठी वेळ नाही.
चहाड्या, चुगल्या, निंदा करायला कोणाला आवडत नाही.
जवळपास इतके काही होत असतं पण लक्ष घालता येत नाही.

मी सहसा कोणाच्या वैयक्तिक बाबतीत नाक खूपसत नाही.
खरं तर माझ्या नाकाची तेवढी लांबी आणि रुंदी नाही.
आणि समजा बळजबरी खुपसले तर ते मानवत नाही.
कशात खुपसण्या सारखे नाक आहे असे मी समजत नाही.

मी सहसा कोणाच्या वैयक्तिक बाबतीत नाक खूपसत नाही.
नाक खुपसण्या सारखे स्वस्त करमणुकीचे साधन काही नाही.
फुकटचा न मागता सल्ला देण्...

SIMPLICITY DAY
Thumb_1573266478
PO#284397
0
0
April 15, 2020
 

वेळ रहात नाही.

जीवन थांबले आहे, संपले नाही.
रात्र आहे, काळ रात्र नाही.
माघार घेतली आहे, युद्ध भुमी सोडली नाही.
दिग्मुढ आहोत, निराश नाही.

तो अदृश्य आहे, मेलेला नाही.
आम्हाला अशक्य आहे, त्याला नाही.
संकटात धावून आला आहे, आम्ही विसरलेलो नाही.
सर्व सोडतील, तो सोडणारा नाही.

हे ही दिवस जातील, महामारी राहणार नाही.
विश्वास ठेवा, तो आम्हाला सोडणार नाही.
मागे वळून पहा, इथे काहीच सदासाठी रहात नाही.
वेळ थांबत नाही, आज जी परिस्थिती आहे ती उद्या रहात नाही.

- संजय उदगीरकर.

SIMPLICITY DAY
Thumb_1573266478
PO#284397
0
0
April 15, 2020
 

किस्मत।

ये किस्मत भी बडी अजीब चीज होती है ।
जहाँ जगनी चाहिये वंही बुझी बुझी होती है ।
दिखती नही पर कहते है की होती है ।
होती तो अपनी है पर पता नही किस के काबू मे होती है ।

ये किस्मत भी बडी अजीब चीज होती है ।
कहते है इसे अपने हाथों से लिखनी होती है ।
खुद की लिखी किस्मत खुद को पढ़ने मुश्किल होती है ।
अपनी किस्मत दूसरों के पढ़ने की चीज होती है ।

ये किस्मत भी बडी अजीब चीज होती है ।
कभी मेहरबान तो कभी नाराज रहती है ।
किस्मत अच्छे अच्छों को धुल चटाती है ।
कभी उडने तो कभी रेंगने लगाती है ।

ये किस्मत भी बडी अजीब चीज होती है ।
कभी साथ देती है तो कभी भुला देती है ।
एकही वक्त के अलग अलग पहलू दिखाती है ।
अपने परायो की पहचान भी किस्मत ही कराती है ।

ये किस्मत भी बडी अजीब चीज होती है ।
ये जब खुश होती ह...

SIMPLICITY DAY
Thumb_1573266478
PO#284397
1
0
April 13, 2020
 

असं काही नसतं.

असं काही नसतं.
सगळ्यांना सगळं कळत नसतं.
आपणाला बर्‍याचशा गोष्टींचं ज्ञान नसतं.
कोठे काय बोलावं आणि कोठे बोलू नये हे कळतं नसतं.

खोडंच असते.
नको म्हणाले तेच करावे वाटते.
पडल्यावरच केळीची साल डोळ्यांना दिसते.
उगीचचं सगळे काही कळतं असं वाटते.

पोकळ शहाणपणा शिवाय काही नसतं.
सोप्पं आहे असे वाटणारं सोप्पं नसतं.
चांगलं सांगितलं तर कोणाला पटत नसतं.
मनातले करण्या शिवाय दुसरे काही सुचत नसतं.

दुसर्‍यांना त्रास होतोय याची जाणीव नसते.
आपल्या स्वार्थापुढे कशाची तमा नसते.
दहा हात ढालपी असते पण एक हात लाकूड नसते.
पुस्तकी ज्ञानाशिवाय काही नसते.

- संजय उदगीरकर.

SIMPLICITY DAY
Thumb_1573266478
PO#284397
0
0
April 13, 2020
 

घरात.

घरात बसला आहात म्हणून कंटाळून जाऊ नका.
उताविळपणे घराबाहेर पडू नका.
मूर्खपणे आपला प्राण पणाला लावू नका.
बायकोच्या कपाळावरचे कुंकू पुसू नका.

आपल्याच घरात आहात हे विसरू नका.
शूरवीर आहात असा फाजील विचार मनात आणू नका.
घरात बनविलेल्या ताज्या अन्नाला कंटाळू नका.
घर नाही त्यांची काय अवस्था असेल हे विसरू नका.

आपल्या घरातील लोकांना परके समजू नका.
बाहेर जाऊन संक्रमित होऊन येऊ नका.
जिवाभावाच्या लोकांचा जीव धोक्यात घालू नका.
कृपा करून घराबाहेर जाऊ नका.

जातील हो, हे दिवसही जातील हे विसरू नका.
उगीचच याच्या त्याच्या म्हणण्यावर जाऊ नका.
अफवांवर अजिबात विश्वास ठेवु नका.
प्रस्तावित नियमांचे उल्लंघन करू नका.

- संजय उदगीरकर.

SIMPLICITY DAY
Thumb_1573266478
PO#284397
0
0
April 4, 2020
 

असे उगीचच काही.

असे उगीचच इथे काही होत नाही.
महामारी येऊन दारावर उभी रहात नाही.
माणसाला आपले जीवन क्षणभंगुर आहे हे लक्षात रहात नाही.
सगळे काही मलाच हवे हा विचार डोक्यातून जात नाही.

असे उगीचच इथे काही होत नाही.
जिथे कारण नसल्या शिवाय झाडाचे पानही हलत नाही.
तिथे महामारी आगंतुक येईल हे खरे वाटत नाही.
आपल्याला आपल्या स्वार्था शिवाय दुसरे काही लक्षात रहात नाही.

असे उगीचच इथे काही होत नाही.
आपण कधी मागे वळून पहात नाही.
आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
कोणी दाखवली तर ती बघावी वाटत नाही.

असे उगीचच इथे काही होत नाही.
असे का होत आहे याचा आपण विचारच करत नाही.
आपल्याला आपली चुक पटत नाही.
कोणी दाखवली तर ते सोसत नाही.

असे उगीचच इथे काही होत नाही.
माणूस असा उगीचच पटकन मरत नाही.
पृथ्वी त्या...

SIMPLICITY DAY
Thumb_1573266478
PO#284397
0
0
March 24, 2020
 

आजकल।

आजकल दिन कुछ इस तरह कट रहे थे।
हजारों मे लोग बेवजह दुनिया से उठ रहे थे।
जान बचाने की दवा ढुंड रहे थे।
लाशों की गिनती के वजह से डरे और सहमे हुए थे।

आजकल दिन कुछ इस तरह कट रहे थे।
डरे डरे अपने ही घर मे बंद थे।
बेवजह किसी की साजिश के शिकार हो गये थे।
धुले धुले हाथों को फिर फिर धो रहे थे।

आजकल दिन कुछ इस तरह कट रहे थे।
अपने चेहरे पे अपना ही हाथ घुमाने डर रहे थे।
किसी के छिकंने और खांसने से सहमा रहे थे।
दिनरात चीन को कोस रहे थे।

आजकल दिन कुछ इस तरह कट रहे थे।
कल तक बडे बडे सपने देख रहे थे।
अब जिंदगी के कितने दिन बचे होंगे इस सोंच मे डुबे थे।
लढे बिनाही हम जंग हार रहे थे।

आजकल दिन कुछ इस तरह कट रहे थे।
पता नहीं आसमानों मे रहने वाले कंहा और कैसे थे।
शायद जमीनी हकीकतों से ना...

SIMPLICITY DAY
Thumb_1573266478
PO#284397
0
0
February 6, 2020
 

ये तेरा ये मेरा।

ये तेरा ये मेरा।
थोडा थोडा जरा जरा।
बटता गया सब कुछ जरा जरा।
कमजोर को सुखा सुखा, ताकतवर के हिस्से मे हराभरा।

बाटते बाटते खत्म हुआ सारा।
जख्मों से खून बहता रहा कतरा कतरा।
आदमी की बस्ती मे इंसान फिरता रहा मारा मारा।
जीता रहा उधार की सांसो पे जरा जरा।

इतना सा तो कहना था मेरा।
जिदंगी पे थोडासा हक है मेरा।
क्युं जियुं मै मरा मरा।
क्या था तेरा और क्या था मेरा।

भरम है ये सारा।
आखरी वक्त खाली सब पिटारा।
चंद सांसों का खेल है ये सारा।
अंहकार के आगे मजबूर जग सारा।

जर, जोरू और जमीन मे अटका आदमी बेचारा।
मरते दम तक रहा कोरे का कोरा।
आदमी से इंसान न बन सका नाकारा।
ये मेरा, ये मेरा कहते खाली हात गया बेचारा।

- संजय उदगीरकर।

JUST LOVE
Thumb_1573266478
PO#284397
0
0
December 5, 2019
 

नेमत ।

इजहार के लिए लफ़्ज़ों की जरूरत कंहा होती है।
मोहब्बत लफ़्ज़ों की मोहताज कंहा होती है।
बेदार नजरों की जरूरत होती है।
प्यार से भरे दिल की जरूरत होती है।

मोहब्बत अपने आप जाहिर होती है ।
जैसे फुल खिलते ही खुशबू महकती है ।
जैसे बरसात मे आसमान मे धनक दिखती है ।
मोहब्बत खुद ब खुद जाहिर होती है ।

मोहब्बत भी एक अजीब शय होती है ।
जो करना चाहो तो कंहा  होती है ।
ये दौलत किस्मत वालों के नसीब मे होती ।
ये रब की दी हुई नेमत होती है ।

- संजय उदगीरकर ।

SUPPORT AND SAVE US!
Thumb_1573266478
PO#284397
0
0
December 5, 2019
 

अजीब।

अब अपने हाथों से कुछ होता नही।
और जो हो रहा है उसे अपनी आंखों से देखा जाता नही।

आदमी इतना गिर सकता है यह कभी सोचा नही।
गिरे हुए आदमी को देख के भी यकीन होता नही।

जिदंगी मे कल क्या होने वाला है इसका तो पता नही।
आने वाले कई पुश्तों का इंतजाम हो गया फिर भी दिल भरता नही।

मौत दरवाजे पे दस्तक दे रही है फिर भी हाथों से चाबियों का गुच्छा छुटता नही।
मरने के बाद भी दुनिया से रिश्ता तुटता नही।

आदमी को कितना भी पढलो फिर भी आदमी समझ मे आता नही।
आदमी के उतना अजीब दुनिया मे दुसरा कुछ है ही नही।

- संजय उदगीरकर ।

SUPPORT AND SAVE US!
Thumb_1573266478
PO#284397
0
0
November 29, 2019
 

कोई माने या न माने।

कुछ किस्से, कुछ कहानियां और कुछ अफसाने।
दोस्तों की मैफिल मे भरते और खाली होते हुए पैमाने।
मिलने के कुछ नये और कुछ पुराने बहाने।
दोस्त नए और घीसेपीटे पुराने।

कुछ शिकवे, कुछ शिकायते और कुछ गलतफहमियां।
कुछ अफवाहें, कुछ सच्ची और कुछ झुठी कहानियां।
कुछ जानबूझकर और कुछ अनजाने मे हुई नादानीयां।
कुछ असली और कुछ नकली परेशानीयां।

कुछ शायरी, कुछ नगमें और कुछ गझले।
कुछ बुझते हुए और कुछ जलते हुए सीनों मे शोले।
जिक्र मे हो कुछ इश्क के मरहले।
कुछ बकवास और कुछ सुनेसुनाये चुटकुले।

जिक्र मे हो शमा और परवाने।
जिक्र मे हो जमाने नये और पुराने।
कुछ नये और पुराने फिल्मी गाने।
सुननेवालों के जज्बातों के साथ खेलने।

दोस्त कुछ मस्ताने और कुछ दिवाने।
कुछ जाने-पहचाने और कुछ अनजाने।
...

SUPPORT AND SAVE US!
Thumb_1573266478
PO#284397
0
0
November 12, 2019
 

इतकुशी.

इतकुशी आमची स्वप्ने.
इतकुसे आम्ही मनाने.
इतकुसे आम्ही कुटूंबाने.
समाधान पावतो इतकुश्याने.
तशी ती आहे प्रेमळ मनाने.

घर भरले आमचे एकाच मुलाने.
अडचण होते आलेल्या पाहुण्याने.
याचमुळे सोडले आहे यायचे आईवडिलाने.
इतकुशे आहोत आम्ही जागेने.
तसा तीला खुप आनंद होतो आदरतिथ्य केल्याने.

थकुन जाते ही इतकुश्या कष्टाने.
मदतीसाठी हाक मारते हक्काने.
भार पडतो फार हिच्यावर जर काम केले हीने एकट्याने.
म्हणून घरातील कामे वाटुन घेतली आहेत अर्धी अर्धी आनंदाने.
तशी ती मजबूत झाली आहे केलेल्या कष्टाने.

हौसेने कधी कधी तयार करते नवीन व्यंजने.
रोज पोट भरावे लागते इतकुश्या स्वयपाकाने.
बेचव अन्न खावे लागते चवीने.
फुलून जाते इतकुश्या स्तुतीने.
हिला स्वयपाक करायला शिकवला आहे हिच्या आईने.

त्रास होतो इतकुश्या...

WORLD WATERCOLOR MONTH
Thumb_1573266478
PO#284397
0
0
November 11, 2019
 

वो भी।

वो भी क्या दिन हुआ करते थे।
हमारे सर पे काले घने बाल हुआ करते थे।
हम टकलों पे खुब हसा करते थे।
जनाना हमे देख सांसे थाम लिया करते थे।
हमे दुर तक कनखियों से देखा करते थे।

आज हम उजडे चमन हुए है।
हमउम्र औरतौं के भी अंकल हुए है।
टकलों की खुशियों की वजह बने हुए है।
टकले अब हमे प्यार से काका कह के बुलाते है।
आईने से अब हमने दुश्मनी पालली है।

जवान बच्चीयोंने तो जीना हराम कर रखा है।
दादा या नाना कह के आवाज देना शुरू किया है।
मौहल्ले मे पैदल कंही आना जाना दुश्वार हुआ है।
मुझसे कई साल बडी औरतौंने भी अब मुझे भैया कहना शुरू किया है।
भगवान भी न जाने किन पापों की सजा दे रहा है।

- संजय उदगीरकर।

LIGHT LETTRS LOGO
Thumb_1573266478
PO#284397
0
0
November 11, 2019
 

ती आणी मी.

मी जेंव्हा माझ्यात मला हुडकतो.
जिथे पहावे तिथे तीलाच पहातो.

मी ला मी स्वतः विसरावे.
मी ने फक्त तीलाच लक्षात ठेवावे.

मी आणी ती किंवा ती आणी मी.
जसे मी व्हावे ती आणी तिने व्हावे मी.

प्रेमाची शेवटची सीमा गाठावी.
तीच्यामुळे माझी ओळख व्हावी.

जशी नदी आणि समुद्राची एकी व्हावी.
तशी आमच्यात  व्हावी.

दोघांची एकच ओळख व्हावी.
जशी दुधाची आणि साखरेची एकी व्हावी.

तीची तिच्या जीवनातील आसक्ती वाढावी.
आमच्या प्रेमाची वेल फुलांनी बहरावी.

- संजय उदगीरकर.

LIGHT LETTRS LOGO
Thumb_1573266478
PO#284397
1
0
November 8, 2019
 

पैमाने।

पैमाने को इस बात का इल्म नही ।
उसमे शराब भरी हुई है और कुछ नही ।

जिसे वो चूमना समझ रहा है वो चूमना नही ।
उसमे से शराब चुसी जा रही है और कुछ नही ।

गरचे पैमाने मे शराब भरी न होती ।
तो उसकी कीमत दो कौड़ी की न होती ।

पैमाने भी हद करते है, जब खाली होते है ।
तब भी बोसे की आस मे रहते है ।

पैमाने नादान होते है, अपने आप पे इतराते है ।
नही जानते की इज्जत पैमानों की नही शराब की होती है ।

शराब न हो तो पैमानों की कोई औकात नही ।
शराब से लबालब हो तो इनकी इज्जत शहेनशा से कम नही ।

पीने वालों के लिए मैखाना इबादतगाह से कुछ कम नही ।
पैमाने से शराब चुसना इबादत से कतई कुछ कम नही ।

पैमाने अपने मे शराब होने का गुमान करते है ।
पर नशा क्या होता है इस से अनजान रहते है ।

- संजय उदगीरकर ।

LIGHT LETTRS LOGO
Thumb_1573266478
PO#284397
0
0
November 8, 2019
 

काश के।

काश के सिर्फ मांगने से इज्जत मिल जाती ।
ये मांगने से नही मिलती ये बात हमे पहले समझ मे आती।

काश के बाजारों मे शोहरत खरीद के मिल जाती ।
हमारे पाप की बेशुमार कमाई कुछ तो काम आती।

काश के हमे भी अच्छों की पहचान होती ।
चमचों, चापलूसों, कमीनों और मक्कारों से निजात मिल जाती ।

काश के हमे इन्सान बनने की तरबीयत मिल जाती ।
सिर्फ आदमी बने रहने की नौबत हम पे नही आती ।

काश के कुछ अच्छे लोगों की सोबत मिल जाती ।
जीने के मकसद की जानकारी हो जाती ।

काश के हमे इबादत की अहमियत मालूम होती ।
आखरी वक्त जहेन मे खौफ की हुकूमत न होती ।

- संजय उदगीरकर ।

LIGHT LETTRS LOGO
Thumb_1573266478
PO#284397
0
0
November 7, 2019
 

मेरे अपने।

मरे अपने ही मुझे नजरे आतिश कर गये।
मुझे मुकम्मिल राख होता देख कर ही गये।

मेरे जिस्म से मेरी रुह क्या निकल गई।
मेरे अपनों की मेरी ओर देखने की नजर ही बदल गई।

पहले जो हस हस के मिला करते थे।
मेरी आंखें क्या बंद हुई मुझे देख छाती पीट कर रो रहे थे।

सिर्फ मेरी सांसे क्या बंद हुई
मेरे अपनों के हाथों मेरी शकसियत ही मिट गई।

जो मेरे साथ चलने कतराते थे।
आज मुझे कांधो पे उठा के ले जा रहे थे।

ये सब मेरे है इस वहेम मे हम जीये जा रहे थे।
ये सब तो सिर्फ मेरे सांसो से रिश्ता निभा रहे थे।

- संजय उदगीरकर।

LIGHT LETTRS LOGO
Thumb_1573266478
PO#284397
1
0
November 5, 2019
 

नवीन श्रीमंत.

नवीन नवीन श्रीमंत झालेले.
आत्मस्तुती करण्यात पटाईत झालेले.
आपला भुतकाळ विसरलेले.
डोळे झाकून दुध पिणारे मांजर झालेले.

पैसा आल्याने उतलेले आणी मातलेले.
सर्वांना तुच्छ समजून बसलेले.
पैसा कसा कमावला आहे हे विसरलेले.
कुकर्मात बरबटलेले.

खालचे सोडून वर गुंडाळलेले.
पैसा आल्यावर धर्मपरायण झालेले.
आत्म्याने मेलेले.
जिवंत प्रेत झालेले.

बोक्या सारखे सोकावलेले.
जाणीव शुन्य झालेले.
आपणही मरणार आहोत हे विसरलेले.
देव आणी धर्म विकत घ्यायला निघालेले.

न इकडचे न तिकडचे राहिलेले.
वंशजाना पापाची कमाई देऊन गेलेले.
काजव्यां सारखे चमकलेले.
उजाडणार आहे हे विसरलेले.

ह्यांच्या सारखे इथे किती आले आणी गेले.
ही गोष्ट आहेत हे विसरलेले.
बुद्धीने भ्रष्ट झालेले.
पैसा पैसा करत शेवटी मेलेले.

- संजय उदगीरक...

LIGHT LETTRS LOGO
Thumb_1573266478
PO#284397
0
0
November 5, 2019
 

काय आहे.

आपले दुःख आपल्यालाच सोसावे लागते.
मेल्यावरच स्वर्ग पहावयास मिळत असते.
बाकीचे सर्व फुकाफुकीचे बोलणे असते.
भुकेला काहीतरी खायलाच लागते.

माणसाचे वागणेच दुट्टपी असते.
सहानुभूती दाखवणे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असते.
जेवू घालणे म्हणजे बोलाचाच भात आणी बोलाचीच कढी असते.
लोकांचे बोलणे एक हात लाकूड आणी दहा हात ढालपी असते.

आपले झाकून दुसर्‍यांचे वाकुन पहायची लोकांना सवयच असते.
दुसर्यांचे दुःख विकृत मानसिकतेच्या लोकांना अपसुक सुख देऊन जाते.
म्हणून आपले दुःख लपवायचे असते.
चार लोकात नसलो तरी सुखी आहोत असे दाखवायचे असते.

आजकाल वन ग्रामचा जमाना आहे.
जे जे डोळ्यांना दिसत आहे तो फक्त मुलामा आहे.
आत काय आहे हे पाहून करायचे तरी काय आहे.
शेवटी आपले दुःख आपल्यालाच सोसावयाचे आहे.

- संजय उ...

LIGHT LETTRS LOGO
Thumb_1573266478
PO#284397
1
0
November 3, 2019
 

क्या बताऊँ।

क्या बताऊँ यारों

ये तो मेरे सर पे चढी है।
फटनेवालों की फटी पडी है।
यारों की इतनी जली है की हरसू राख उडी है।
कैसे बुझाऐ ये आग, यारों को बस अब ये फिक्र बडी है।

क्या बताऊँ यारों

मेरी तो बस चल पडी है।
जलने वालों की रातों की नींद उडी है।
जबसे ये आके मेरे पास खडी है।
यारों की जिंदगी जहन्नुम हो पडी है।

क्या बताऊँ यारों

लडकी कंहा ये तो फुलझडी है।
उसकी तो सिर्फ मुझसे आंख लडी है।
मेरी किस्मत को देख यारों की खटीया खडी है।
यारों ये दोस्ती भी बासी कढी हो पडी है।

क्या बताऊँ यारों

जिदंगी मे खुदगर्जी की जरूरत बडी है।
चापलूसों चमचों की आजकल इज्जत बडी है।
ग्यान की बातें किताबों मे पडी है।
जाहिलों की पढ़े-लिखों मे इज्जत बडी है।

क्या बताऊँ यारों

लोगों को आजकल जलने की आदत पड...

HAPPY HALLOWEEN 2019
Thumb_1573266478
PO#284397
1
0
November 3, 2019
 

मीठ.

कशात कमी, कशात जास्त तर कशात नाही.
स्वयपाकात मीठाची गोष्ट सांगण्यासारखी नाही.
नवरा कधी बायकोकडे तर कधी व्यंजनाकडे पाही.
बायकोला याबाबतीत काही बोलण्याची सोयही नाही.

मीठ कमी असल्यास वरून घालून मिसळावे.
जास्त झाले असल्यास जिन्नसास वाढवावे.
अजिबातच नसल्यास चवीनुसार मीठ घालावे.
सुज्ञ नवर्‍याने हे लग्ना आधीच जाणून घ्यावे.

खालि मान घालून जेवण्या शिवाय गत्यंतर नाही.
मान वर केल्यास बायको डोळे वटारून पाही.
तिखट पदार्थाने जरी होत असेल लाही लाही.
पदार्थ बिघडला असला तरी तसे म्हणायचे नाही.

जो अज्ञानी हे सुवर्ण नियम ना पाळी.
दुःख अतोनात लिही देव त्याच्या भाळी.
होतात अश्याचे अपमान वेळी अवेळी.
बायको अश्या नवर्‍यास कुत्र्यासम पाळी.

दसरा असो अथवा दिवाळी.
संक्रात असो अथवा होळी.
गोड पदार्थ म्ह...

HAPPY HALLOWEEN 2019
Thumb_1573266478
PO#284397
1
0
November 2, 2019
 

चाहता हूँ।

बस तेरे जैसा होना चाहता हूँ।
जिदंगी को मायना देना चाहता हूँ।

चाहने से भी ज्यादा चाहना चाहता हूँ।
तेरी हर ख्वाहिश पे कुर्बान होना चाहता हूँ।

मेरी सांसे देना चाहता हूँ।
बदले मे सारे रंजो गम लेना चाहता हूँ।

तेरे बगैर मरना चाहता हूँ।
तुझे यंहा नही तो वंहा पाना चाहता हूँ।

वफा की हर इम्तिहान देना चाहता हूँ।
खुन से दिल पे तेरा नाम लिखना चाहता हूँ।

तेरे लिये ही जीना और मरना चाहता हूँ।
जिंदगी तेरे नाम वक्फ करना चाहता हूँ।

- संजय उदगीरकर।

LAST HUG
Thumb_1573266478
PO#284397
1
0
October 31, 2019
 

पुरुषांचे हळदीकुंकू.

पुरूषांचा सुद्धा हळदीकुंकवा सारखा कार्यक्रम असायला हवा.

पुरूषांनी सुद्धा एकमेकांना भेटायचा कार्यक्रम करायला हवा.

असा कार्यक्रम वर्षातून कमीतकमी दोनदा तरी व्हायलाच हवा.

ज्या पुरूषांच्या बायका जिवंत आहेत त्या पुरूषांना सवाष्ण नवर्याचा मान मिळायला हवा.

पुरूषांना सुद्धा साडी चोळीसारखा पँटशर्टचा मान मिळायला हवा.

या भेटीच्या दिवशी हळदीकुंकवाच्या तबकासारखे पान तंबाखु विडी सिगारेटीचा तबक पुरूषांत फिरायला हवा.

पुरूषांनी सुद्धा आपल्याकडे हळदीकुंकवासाठी येणार्या पुरूषांचा क्वार्टरची बाटली देऊन मान सन्मान करायला हवा.

पुरूषांना सुद्धा आपल्या सासुरवाडीतील लोकांची निंदा करायचा अधिकार कमीतकमी या दिवशी तरी मिळायला हवा.

या दिवशी सासरा आणी जावई पुरूषांच्या हळदीकुंकवात एकत्र फिर...

#INKTOBER
Thumb_1573266478
PO#284397
1
0
October 29, 2019
 

विसरणे.

विसरणे किती सोयिस्कर आणि सोपे असते.
विसरलो आहोत असे सहजच दाखवता येते.
वेड पांघरून पेड गावाला जाता येते.
विसरून जबाबदारीतून सुटका करून घेता येते.

विसरणे ही सुद्धा एक कला आहे.
विसरला आहात हे खरे वाटणे अवघड आहे.
तुम्ही विसरला आहात हे पटवून देणेच कला आहे.
विसरणे हे सोयिस्करपणे झटकणे आहे.

मग पुढे पुढे खरोखरच विसरण्याची सवय लागते.
न विसरलेले सुद्धा विसरल्यासारखे होते.
विसरणे भोवायला लागते.
लोकात विसरभोळा म्हणून किर्ती पसरते.

विसरतो म्हणून आपल्यापासुन महत्त्वाच्या गोष्टी लपवतात.
आपल्या समोर बिनधास्त काहीही बोलतात.
आपण खरोखरच विसरभोळे आहोत या भ्रमात असतात.
या ढोंगामुळे काही नुकसान तर बरेचसे फायदे असतात.

- संजय उदगीरकर.

#INKTOBER
Thumb_1573266478
PO#284397
1
0
October 29, 2019
 

इंग्लिश.

आपणहून आपल्या पायावर कुर्‍हाड घालून घेतली
इंग्लिश होती म्हणून रात्री मित्रांबरोबर जास्त घेतली
पिऊन परत येऊन ज्या दारावर थाप मारली
ती खोली आमच्या शेजारणीची निघाली.

तीला न पहाताच मी करकचून मिठी मारली
शेजारीण विनयभंग होत असल्यासारखी किंचाळली
माझ्या बायकोने माझी लाज राखली
त्या कजाग शेजारणीच्या पाया पडली.

मला तिथुन सोडवून घरी घेऊन आली
रात्र मस्त इंग्लिशच्या गुलाबी नशेत गेली
सकाळी ही रौद्र रूप धारण करून समोर आली
तिचे ते अक्राळ विक्राळ रुप पाहून माझी बोबडी वळली.

कर्म धर्म संयोगाने आज भाऊबीज निघाली
माझ्या बायकोने मला अंघोळ करायला लावली
नवीन कपड घालायला लावली
पाचशे रूपये सुद्धा बरोबर घ्यायला लावली.

मला ओढत त्याच शेजारणीच्या घरी घेऊन गेली.
त्या शेजारणीला ही म्हणाली
आज पासून तु माझी नणंद...

#INKTOBER
Thumb_1573266478
PO#284397
1
0
October 18, 2019
 

सांगितले नाही.

मी तीला कधी सांगितले नाही.
तीनेही कधी विचारले नाही.
आमच्या प्रेमाला शब्दाची चौकट लागली नाही.
सहजच होते ते शब्दात बांधावे लागले नाही.

आमच्या प्रेमात उच्छृंखलता नव्हती.
ती माझ्या शब्दा बाहेर नव्हती.
मी तीचा अपमान होऊ देणार नाही याची तीला खात्री होती.
आमच्या संसाराच्या गाड्याचे मी मागचे तर ती पुढचे चाक होती.

आमच्या प्रेमात कविता नव्हती.
भेट वस्तूंची देवाणघेवाण नव्हती.
एकमेकांची तोंडावर स्तुती नव्हती.
आम्हाला एकत्र घट्ट बांधून ठेवलेली आणी न सुटणारी एकमेकांवरच्या अतूट विश्वासाची गाठ होती.

आता जीवनाची संध्याकाळ होत होती.
ताटातूट होते का काय याची मला भीती होती.
ती सुद्धा अनाहूत येणाऱ्या संकटाला भिऊन होती.
जुन्या आठवणींच्या गाठोड्याना बिलगून होती.

- संजय उदगीरकर.

...

DO WHAT MAKES YOU HAPPY
Thumb_1573266478
PO#284397
1
0