Explore
Sign Up
Login
April 14, 2019
 

मुलं तरूण झाल्यावर.

मुलं तरूण झाल्यावर कळाले
संगोपनात होते काहीतरी चुकले
आई वडिलांचे श्रम व प्रेम कमी पडले
मुलांना बरेचसे काही द्यायचे होते राहीले.

काळजी वाहतील असे होते वाटले
कळाले आम्हाला आहे त्यानी नापास केले
आमच्या जन्माच्या कष्टाचे हे फळ मिळाले
आमचे वृद्ध होणे त्यांना सहन करणे अवघड झाले.

उपयोगी असणे किती आवश्यक असते हे कळाले
मागणे हे केंव्हाही लाजिरवाणे असते हे कळाले
नाही त्याच्या शिवाय जगणे शेवटी शिकावे लागले
उत्तरार्धात सुद्धा तडजोड करीतच जगावे लागले.

कसे संपवावे उरलेले
जवळचे सगळे दुर झालेले
आठवणीचे उकीरडे शिगोशिग भरलेले
मन आणी बुद्धी खरचटलेले.

मुलं सशक्त व स्वावलंबी झालेले
आम्ही गर्भगळीत झालेले
स्नायू शक्तीहीन व गळालेले
जिवंत राहून मरणाची वाट पहात असलेले.

मुलं तरूण झ...

LETTRS 2019 STAMP
Thumb_1419576748
PO#284397
1
1
March 31, 2019
 

शेवटी.

शेवटी शेवटी कळाले
की जीवन जगायचे राहीले
जिवंत राहण्यासाठी सर्व काही सोसले
छोटे छोटे आनंदाचे पारिजातक वेचायचे राहीले.

शेवटी शेवटी कळाले
खरे प्रेम सहजच असते मिळाले
जर ते आधी आम्ही असते दिले
कळालेच नाही कसे, अहंकाराच्या गाढव काट्याने अंग सजले.

शेवटी शेवटी कळाले
छोटेसे आयुष्य जे होते देवाने दिले
ते कधी न कधी आहे संपणारे, हेच नाही लक्षात राहीले
आम्ही आमच्या हातानेच ते वाया घालवले.

शेवटी शेवटी कळाले
आनंद वाटायचे राहीले
दुःख देण्या-घेण्याचे व्यवहारच जन्मभर केले
जे जे दिले ते ते परत मिळाले.

शेवटी शेवटी कळाले
की पुढच्या जन्माचे सुद्धा वाटोळे केले
पैसा कमावण्यासाठी जे करू नये ते सर्व केले
आपल्या वंशजांसाठी ते सर्व ठेवले.

शेवटी शेवटी कळाले
पुण्याची पुरचुंडी आणी पापाचे गाठोडे बर...

ORIGINAL
Thumb_1419576748
PO#284397
1
0
March 28, 2019
 

ती.

ती मला हवी होती
हे त्याला मान्य नव्हते
ती ज्याला नको होती
तीला त्याला देऊन मला त्याने दुःख दिले होते.

ती मला हवी होती
आमच्या प्रेमाचे अंकुर फुटले होते
त्याला हे पहावत नव्हते
त्याने मला दुःख व्हावे म्हणून ते अंकुर समूळ उपटले होते.

ती मला हवी होती
हे सुंदर स्वप्न खरे होत होते
मला पहाटे पहाटे हे स्वप्न पडत होते
मला ती स्वप्न पाहता येऊ नयेत म्हणून त्यांनी मला अपरात्री उठवण्यास सुरू केले होते.

ती मला हवी होती
असे वाटणे जणू काही पाप होते
आमच्या प्रेमात दैवं आडवे आले होते
ती खरोखरच कुठे मला मिळते का या धास्तीने मला आयुष्य पुर्ण होण्याचा आतंच त्याने मारले होते.

ती मला हवी होती
हवी असण्यात आणी मिळण्यात खुप अंतर होते
कमी होण्या ऐवजी ते वाढतंच होते
मला झापड घातलेल्या बैलासारखे के...

WOLF
Thumb_1419576748
PO#284397
0
0
March 28, 2019
 

माज.

माज आला आहे तुम्हाला
आयतं राज्य मिळाले आहे भोगायला
जातीपातीचे राजकारण हा सोपा मार्ग आहे मिळाला
सिहांसनापर्यंत पोहंचायला.

माज आला आहे तुम्हाला
बट्टा लावत आहात पुर्वजांच्या नावाला
सोकावला आहात हरामचा पैसा खायला
मेलेल्या राजांनासुद्धा लाज वाटत असेल पाहून तुम्हाला.

माज आला आहे तुम्हाला
भीती कशाचीही वाटेनाशी झाली आहे तुम्हाला
कंबरेचे सोडून बांधले आहे डोक्याला
किळस येत आहे पाहून तुमच्या निर्लज्जपणाला.

माज आला आहे तुम्हाला
आपलं भोगून झाल्यावर पुढे केले आहे मुलाला
वारसाहक्काने चालवलं आहे राजकारणाला
घरातील दासी बटकी करून ठेवले आहे राज्याला.

माज आला आहे तुम्हाला
वाळवी लागावी तशे लागला आहात देशाला
इंग्रज बरे होते तुमच्यापेक्षा हे म्हणायची वेळ आली आहे आम्हाला.
आता तुमच्यापासून स्वातं...

LANGUAGES
Thumb_1419576748
PO#284397
0
0
March 28, 2019
 

पपईचे झाड.

घासून विसळून पुसून ठेवलेल्या भांड्या सारखे.
शिळ्या अन्नाला फोडणी घालून ताजे केल्या सारखे.
भांडण करून खुप प्रेम आहे असे दाखवण्या सारखे.
सिनेमात जे पहात आहोत ते खरं आहे असे वाटण्या सारखे.

सगळे काही असुन काही नसल्या सारखे.
उसने दिलेले परत मागता न येण्या सारखे.
फसत आहोत हे जाणवत असता फसवू दिल्या सारखे.
स्मृतीत असुनही विस्मृती झाल्या सारखे.

खोटे सुख जसे चेहर्यावर पावडर फासल्या सारखे.
छोट्याश्या भेटवस्तूला मोठ्या पॅकिंग मधे ठेवून दिल्या सारखे.
मंत्र थोडा आणी थुंका जास्त उडत असल्या सारखे.
लोकांनी चांगले म्हणावे म्हणून जगल्या सारखे.

सगळे दिसत असूनही भास होत असल्या सारखे.
खोटे आहे हे माहित असूनही खर वाटत असल्या सारखे.
जीवन नुसते रंगीत वेष्टण असल्या सारखे.
पपईच्या झाडा सारखे...

ORIGINAL
Thumb_1419576748
PO#284397
0
0
March 23, 2019
 

नाते.

नाते अर्ध्यात सुटले.
विणता प्रेमाचे धागे कमी पडले.
अहंकारास्तव विणणे खुंटले.
अर्धवट नात्यानी हात झटकले.

मी तु पणाचे वाहते पाट अडवे आले.
कागदी बोटीला ते पार करणे अशक्य झाले.
आपल्याहून आपलं प्रतिबिंब मोठे झाले.
आपल्या समोर आपलं माणसं लहान झाले.

विणलेले धागे कच्चे निघाले.
थोड्याश्या ताणामुळे तट तट तुटले.
नात्यांचे रंग सुद्धा अवघड वेळी बदलले.
थोडेसे भिजताच धाग्याला सोडून पळाले.

नाती मजबूत आहेत असे होते वाटले.
नात्यांचे दोरे होते कुजलेले.
तुटण्यास आतुर होते झालेले.
कारण मिळताच अगतिक होऊन तुटले.

स्वार्था समोर सर्वांनी हात टेकले.
शरीर अजस्त्र व मन संकुचित झाले.
रक्ताला आपलेच रक्त सोसवेनासे झाले.
नात्यांनीच नात्याना बुडवले.

- संजय उदगीरकर.

INTROVERTS WEEK
Thumb_1419576748
PO#284397
0
0
March 17, 2019
 

काय काळ आहे.

काय मजेशीर काळ आहे.
कागदांच्या फुलांना वास आहे.
खोट्याकडे खरा कामाला आहे.
घरात शेजारीणीचा कारभार आहे.

काय मजेशीर काळ आहे.
पैसा देव झाला आहे.
सगळा धंदा झाला आहे.
जीवनावश्यक सेवा, पैसे उकळण्याचा आता सोपा मार्ग आहे.

काय मजेशीर काळ आहे.
गुंडाना समाजात मान आहे.
देश पुन्हा गुंड आणी बदमाश राजकारण्यांचा गुलाम आहे.
पैशांचा मोह चरमसीमेवर पोहचला आहे.

काय मजेशीर काळ आहे.
आज माणसाला माणूस कळायला अवघड आहे.
वरून खुप श्रीमंत व आतून कर्जात बुडालेला आहे.
कागदांच्या फुलांचा मळा सगळीकडे फुलला आहे.

काय मजेशीर काळ आहे.
चित्रपटात नायिका उघडी आहे.
नायक नखशिखांत कपड्यात गुंडाळला आहे.
नीतिमत्ता जळून राख झाली आहे.

काय मजेशीर काळ आहे.
अशिक्षीतांसाठी शिक्षण हा व्यवसाय आहे.
पैसे देऊन कोण...

PDHARTPOETRY
Thumb_1419576748
PO#284397
0
0
March 15, 2019
 

ओठांपर्यंत.

अगदी ओठांपर्यंत येते.
तिथे ते वाक्य रेंगाळते.
तिथेच थरथरते.
आणी मग विरघळून जाते.

खुप काही सांगावेसे वाटते.
नंतर लक्षात येते.
की सांगण्यासाठी धैर्य लागते.
त्याची कमतरता भासते.

सगळं सोप्पं असेल असे वाटते.
सगळ्यात अवघड तेच निघते.
प्रयत्न केले तरी सांगायला जमत नसते.
मग मला माझ्यावरचं हसू येते.

आणि मग तिला ते न सांगता कळते.
तिला कळाल्यावर मग सांगणे सोपे होते.
ते त्या वयात लपलेले गुढं असते.
उमलत असलेल्या फुलासारखे असते.

जाणवते पण प्रकट होत नसते.
काय होतंय हे कळत नसते.
सहन होत नाही आणी सांगायची सोय नसते.
काहीही होत नसताना काहीतरी होत असते.

सगळ्यात असूनही एकटं वाटत असते.
एकांतात गर्दीत आहोत असे भासते.
दिवस स्वप्न पाहण्यात व रात्र जागण्यात जाते.
उगीचच कविता लिहावी वाटते....

WRITE YOUR OWN STORY
Thumb_1419576748
PO#284397
0
0
March 8, 2019
 

माय मराठी.

म्हणतात माझी माय मराठी.
चालवायला लागते इतर सर्व भाषांची काठी.
म्हणतात मराठी म्हणजे साखर पिठी.
भाषेच्या मधुमेहामुळे वाटते हिची भीती मोठी.

म्हणतात माझी माय मराठी.
पण इंग्रजी बोलायची हौस मोठी.
मराठमोळ्या धोतराच्या नकोश्या झाल्या गाठी.
कंबरेवर आता चामडी पट्टा शोभतो पँट टिकवण्यासाठी.

म्हणतात माझी माय मराठी.
जीन्स पँट आली मम्मी साठी.
डॅडीने चढवली बरमुडा जशी ओलांडली साठी.
घरात मराठी साहित्य फक्त धुळ खाण्यासाठी.

म्हणतात माझी माय मराठी.
फुकटच्या हव्यात कोणाला त्या कविता मराठी.
कळत नसल्या तरी पैसे देऊ उर्दू गझलांसाठी.
जीव तडफडतो ती उर्दू भाषा शिकण्यासाठी.

म्हणतात माझी माय मराठी.
इंग्रजीत बोलावे लागते पिंडास कावळा शिवण्यासाठी.
मराठी माणसाला इंग्रजासारखे राहण्याची हौस मोठी.
...

LIGHT LETTRS LOGO
Thumb_1419576748
PO#284397
1
0
March 5, 2019
 

मकसद ।

मकसद एक ही है जीने का ।

बेशुमार दौलत कमाने का ।
बहोत सारा पैसा पकड़ने का ।
हक हलाल इनके बारे मे नही सोंचने का ।

पैसा कमाने के लिए जरूरी नही पढे-लिखे होने का ।
हुनर चाहिए धोखा देने का ।
चिकनी चुपड़ी बाते करके लोगों को फसाने का ।

औलाद को भी अपने जैसाही बनाने का ।
हराम का खाने का आदी बनाने के ।
लूट खसोट कुछ भी करने का ।

साथ मे नही आयेगा ये नही सोंचने का ।
छिनके झपटके कैसे भी हो पैसा कमाने के ।
पैसों के लिए चाहे तो पीठ पे वार करने का ।

जब जल्दी जल्दी अमीर है बनने का ।
तब गुनाहगारों के रास्ते पे बेझिजक चलने का ।
जेल मे आने जाने से कतई नही शरमाने का ।

पैसे को ही खुदा बनाने का ।
पैसे की ही इबादत करने का ।
जिसके पास है उसको ही अपना मुरशद बनाने का ।

किस का भी कुछ भी हडपने का ।
झूठ, फरेब...

LION IN THE STARS
Thumb_1419576748
PO#284397
0
1
March 3, 2019
 

नजर.

भिडता नजरेशी नजर.
समजा की माणूस झाला सर.
नजर जशी जशी जाई खोलवर.
तशी तशी जखम होई जबर.

सोडता सोडीना ती नजर.
मिटवी पळभरात अंतर.
लक्षात न ये काही नंतर.
जसे फिरे मोरपिस अंगभर.

कधी जहाल फार.
जीवाशी करी बेजार.
पाहते आरपार.
बेदरकार.

कशी ती नजर.
लटकवे जीव अधांतर.
फाडते हृदय टराटर.
काळीज चिरते चरचर.

वळवळती ती नजर.
अहंकार जाळे जसा कापर.
मन होई कातर.
वाटे झालो भार पृथ्वीवर.

नजर नव्हे ती आहे खंजीर.
ती घुसता प्राण होई निघण्या अधीर.
बुद्धी होई बधीर.
अशी भेदक नजर बाळगे फक्त वीर.

काय वर्णावी ती नजर.
जसा विळख्यात घेई अजगर.
चिकटते सर्व अंगभर.
पडेल तिथे होई चरचर.

अशी तशी नव्हती ती नजर.
नव्हती त्या तोडीची कोणती नजर.
घायाळ करी जर अडकली नजरेत नजर.
म्हणे येई शरण नाहीतर मर.

माहीत नव्हता तिला ...

BLACKBIRD POET
Thumb_1419576748
PO#284397
0
0
March 3, 2019
 

रंग बदलतो.

आपण सरड्याला उगीचच नावं ठेवतो.
त्याच्याहून जास्त रंग तर आपण बदलतो.
आपला स्वार्थ ज्याचात गुंतलेला असतो.
आपण त्याच्याशीच चांगले वागतो.
ज्याची तोंडावर खोटी स्तुती करतो.
माघारी त्याचीच मनसोक्त निंदा करतो.
सरडा आपले प्राण वाचविण्यासाठी रंग बदलतो.
आपण फसविण्यासाठी रंग बदलतो.
आपण सरड्याला उगीचच नावं ठेवतो.
स्वार्थ असला की गांडूळा सारखे गुळगुळीत होतो.
नाहीतर नागासारखे फुत्कार मारतो.
सरड्याने सुद्धा लाजावे इतके एकाच रंगात कितीतरी रंग मिसळतो.
देव सुद्धा आपल्याला पाहून दंग होतो.
त्याच्या समोरही भक्तीचे आपण केवढे ढोंग करतो.
अकरा रूपयाचे पेढे देऊन अकरा कोटी रूपये नगद मागतो.
मग सरडा देवाकडे पाहून हसतो.
सरडा देवाला खजिल करतो.
आपण सरड्याला उगीचच नावं ठेवतो.

- संजय उदगीरकर.

 

MAKE YOUR MARK
Thumb_1419576748
PO#284397
0
1
March 3, 2019
 

स्वप्नच होते ते.

स्वप्नच होते ते.

जे मला माझ्या गाढ झोपेत पडले होते.
अगदी खरं वाटत होते.
खुप वेळ माझे मन त्या स्वप्नात गुंतले होते.
जाग आल्यावरही स्मृतीत रेंगाळत होते.

त्यात माझ्याकडे सर्व कांही होते.
स्वप्नाने मला गर्भ श्रीमंत केले होते.
माझे दारिद्र्य त्या स्वप्नाने छान लपवले होते.
दिवसाच्या जीवनाच्या विपरीत स्वप्नात होते.

दुःख हुडकून सुद्धा मिळत नव्हते.
स्वप्नातील मनात षडरिपु नव्हते.
स्वप्नात माणसे माणसा सारखेच वागत होते.
जे खरे असावे ते स्वप्नात होते.

अशीच स्वप्ने पडावीत असे मनात येत होते.
स्वप्नात ते सर्व सहज शक्य होते.
जे जागृत अवस्थेत दुरापास्त होते.
माणसाला माणसा सारखे जगणे आता स्वप्नातच शक्य होते.

स्वप्नच होते ते.
असत्यातले सत्य होते ते.
हिरवे गार वाळवंटच होते ते.
...

RUBY DHAL
Thumb_1419576748
PO#284397
0
0
March 2, 2019
 

LIFE IS.......
Life is what I make of it.
It's like a clay, I have to mould it.
I have to decide what to make out of it.
I should learn to enjoy it.
I have to fill it.
With sorrow or pleasure, I have to choose it.
I can gamble it.
Till it's over it's mine to have it.
Blow it, spill it, spit it or spoil it.
I only will have to repent for it.
It's only for once, remember it.
I can make an example out of it.
For others to accept it.
As an ideal to follow it.
Savour it or swallow it.
Live it or endure it.
I will never understand it.
Unless it's over and when I can't relive it.
If I value it.
It's precious and I have to be possessive about it.
Life is what I make of it.

- Sanjay Udgirkar.
 

...

MASAHIRO TANAKA
Thumb_1419576748
PO#284397
1
0
February 28, 2019
 

चट्टान ।

आदमी हूँ कोई पत्थर की चट्टान नही ।
जो टुट जाऊं पर झुकूं नही ।
अदना सा हूँ ग़ौर से सोंचू तो मेरी औकात कुछ नही ।
जिंदगी मेरी हालत से समझौतों के सिवा कुछ नही ।

आदमी हूँ कोई पत्थर की चट्टान नही ।
वक़्त के आगे मेरी हस्ती तिनके से बढ़कर कुछ नही ।
चढ़ते सूरज को सलाम करने के अलावा मेरे बस मे कुछ नही ।
कल तक जो जल्लाद थे आज वो भगवान से कम नही ।

आदमी हूँ कोई पत्थर की चट्टान नही ।
इस कायनात का छोटासा हिस्सा हूँ ओर कुछ नही ।
आज रवांदवां हूँ कल खाक से बढकर कुछ नही ।
आज जो मेरे अपने है कल मुझे पहचानेंगे भी नही ।

आदमी हूँ कोई पत्थर की चट्टान नही ।
कई बार बना ओर मिटा हूँ मेरा कोई वजूद नही ।
गमों से जूझता तो हूँ पर खुशियों के लिये तरसता नही ।
लगता तो सच ही हूँ पर मै भरम के सिवा कुछ नहीं ।

आदमी ह...

MAKE YOUR MARK
Thumb_1419576748
PO#284397
1
0
February 26, 2019
 

जाणीवेचे.

जाणीवेचे असेच काहीतरी असते.

एखाद्याला असते.
तर एखाद्याला नसते.

कधी कशाची असते.
तर कशाची नसते.

कधी असेल असे वाटते.
पण ती नसते.

कधी नसावी तितकी असते.
असल्याने जीव नकोसा करते.

कधी अचानकच येते.
कधीकधी जाताना ओशाळल्या सारखी वाटते.

कधी आहे का नाही असे वाटते.
नाही म्हणावी तर असते.

कधी परदुःख पाहून मन हळहळते.
कधी ते पाहून न पाहिल्या सारखे करावे वाटते.

कधी कापरा सारखी असते.
कळत नकळत नाहीशी होते.

जाणीवेचे असेच काहीतरी असते.

- संजय उदगीरकर.

MAKE YOUR MARK
Thumb_1419576748
PO#284397
0
1
February 26, 2019
 

आठवण.

जशी अचानक पावसाची सर येते.
ढगाने भरलेल्या आकाशात वीज चमकते.
थंड वार्याची झुळूक अंगाला झोंबते.
तशी तीची आठवण येते.

त्यानंतर मन उदास होते.
मनात मग ती बराच वेळ रेंगाळते.
जशी थंडीच्या दिवसातील रात्र असते.
संपता संपत नसते.

डोळे पाणावलेले करते.
उगीचच रडावेसे वाटते.
आठवण सुद्धा इतका त्रास देते.
मनात तिचे येणे अथवा जाणे आपल्या हातात कुठे असते.

कधी कधी प्रत्यक्षात दिसते.
ती वेळ तर जीव घेणारी असते.
कुठे चुकून तिची नजर आपल्यावर पडते.
या विचाराने छातीत धडधडते.

बराच वेळ मग सुगंधा सारखी दरवळते.
काय गमावले याची जाणीव हृदय चिरते.
उन्हाच्या कवडस्या सारखी मनावर पडते.
मग जाणीव बुझते.

सापा सारखी मनाला वेटाळते.
हळूहळू पिळ आवळते.
जीवन मरणाच्या जाणीवेच्या पलीकडे नेते.
आपलं अस्तित्वच शंकेत आणते.

...

ORIGINAL
Thumb_1419576748
PO#284397
0
0
February 21, 2019
 

भिखमंगा ।

ईतने हथियार जो जमा किये है ।
क्या उन्हे ऐसेही रखने के लिये जमा किया है ।
और अपने कितने मरने का इंतज़ार है ।
तुम्हारा पडोसी तुम्हे ललकार रहा है ।

समुद्र की तरहा अथाह फैली फौज किसलिए है ।
इतना बडा मिसाइलों का भंडार किसलिए है ।
इतनी पनडुब्बीयां, युद्धपोत किसलिए है ।
जिसे कांधे पे हाथ नही रखना चाहिए वो कंधे पे बैठ के कान मे मुत रहा है ।

अपनी औकात से बडी बात कर रहा है ।
कायर पीठ मे खंजर घोप रहा है ।
मासूमों की जान ले रहा है ।
मजहब के नाम पे लोगों को बरगला रहा है ।

हाल हाल की पैदाइश है ।
अपने बाप को डर बता रहा है ।
खैरात मे मुल्क जो मिला है ।
ये तो पेशेवर भिकारी बन गया है ।

कितने भी जुते मारो ये बेगैरत दर पे खडा है ।
इस भिखारी मुल्क का कुछ पक्का इलाज करना अब जरूरी है ।
कश्मीर मे ये भ...

WHITE CLOCK
Thumb_1419576748
PO#284397
1
0
February 19, 2019
 

मच मच ।

अब मच मच मच मच बंद करो ।
ये मसला जड़ से खत्म करो ।
न रहे बांस न बजे बांसुरी कुछ ऐसा करो ।
रोज रोज की किरकिरी से हमे आजाद करो ।

अब मच मच मच मच बंद करो ।
लातों के भूतों से बात मत करो ।
कुछ उनकी बदनीयती का भी लिहाज़ करो ।
जो चार बार दिया है उसे आखरी बार पेश करो ।

अब मच मच मच मच बंद करो ।
इस नाजायज मुल्क का आखरी इलाज़ करो ।
अपनी मौत मांग रहा है उसे दुनिया से रुख़सत करो ।
अबकी बार छोडो मत सीधा दफ़न करो ।

अब मच मच मच मच बंद करो ।
कौन क्या कहेगा इसकी फ़िक्र अब मत करो ।
अब बस एक ही बात करो मारो या मरो ।
जीना मुश्किल और मरना दुशवार करो ।

अब मच मच मच मच बंद करो ।
चालीस के चार लाख ये हिसाब करो ।
तुम से ना होगा अब फौज को आगे करो ।
भाई अब गोली अंदर दम बाहर करो ।

अब मच मच मच मच बंद करो ।
जमीन...

WHITE CLOCK
Thumb_1419576748
PO#284397
1
0
February 18, 2019
 

मी असा का आहे.

मी असा का आहे.
नसावे तेच माझ्यात का आहे.
खरे कमी आणी खोटे जास्त का आहे.
प्रेम कमी आणी ढोंग जास्त का आहे.

मी असा का आहे.
माझे नाही तेच का हवे आहे.
स्वार्था पुढे सर्व तुच्छं का आहे.
देतो कमी आणी घेतो जास्त का आहे.

मी असा का आहे.
मी फक्त माझ्यासाठीच का आहे.
सगळ्यांना मी वापरतो आहे.
माझी वेळ आली की मी अलिप्त का आहे.

मी असा का आहे.
मी फक्त घेतचं का आहे.
देणे मला कोठे ठाऊक आहे.
माझ्यात नुसती हावचं का आहे.

मी असा का आहे.
मी फक्त शोषण करत आहे.
मो शोषित केंव्हा होणार आहे.
का मी असाच राहणार आहे.

मी असा का आहे.
वरून तर मी सर्वसाधारण आहे.
आतून मी इतका वेगळा का आहे.
मला ओळखणे लोकांना किती अवघड आहे.

- संजय उदगीरकर.

ORIGINAL
Thumb_1419576748
PO#284397
0
0
February 18, 2019
 

खुशबू ।

तेरे बदन की खुशबू मे खोया हूँ ।
पता नही जाग रहा हूँ ।
या सोया हुआ हूँ ।
मै कंहा था ओर कंहा हूँ ।

जो देख रहा हूँ ।
मै आसमान मे या फिर जमीन पे हूँ ।
जान तो लूं के सच है या मै ख्वाब मे हूँ ।
इतना हसीन मंज़र जो देख रहा हूँ ।

पता तो करो की क्या मै जिंदा हूँ ।
तुम्हारे आगोश मे जो हूँ ।
लगता तो है की मै जन्नत मे हूँ ।
दोनो एक जैसे है इसलिए हैरां हूँ ।

कभी सोंचता हूँ ।
की क्या वो मै ही हूँ ।
जो तुम्हारे रूबरू हूँ ।
ये सच है या फिर मै गुमां मे हूँ ।

कहते है की मै मेरे किस्मत पे इतराता हूँ ।
कई जन्मों का सवाब है जो तुमको अपना कहलाता हूँ ।
इसी बात पे मै भी फख्र करता हूँ ।
की तुम मेरे और मै तुम्हारा हूँ ।

- संजय उदगीरकर ।

VIEWERS WORLDWIDE
Thumb_1419576748
PO#284397
0
0
February 16, 2019
 

मोठेपण.

जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
हि स्थिती झाली जुनी जाण
कर्ज करूनही टिकवावे मोठेपण
हे आजचे चातुर्य जाण.

जर नाही अंगी मोठेपण
त्याचे जीवन कुत्र्यासम जाण
शिळ्या कढीला जसे उधाण
त्याला वापरतील जसे पायातील वहाण
विचारणारही नाहीत की तु आहेस कोण.

बाळगावे फुकाचे मोठेपण
जसे कुत्र्याचे शेपूट जाण
आपली आपाल्याला येत नसते घाण
खोटे नाटे बोलत रहावे घेऊ नये डोक्यावर ताण.

मी जे बोलत आहे ते सत्य हे जाण
आजकाल पैश्याकडे असती अक्कल गहाण
जर पैसा नाही तर किंमत थुंकीहूनही कमी जाण
खोटी का असेना असावी शान त्यासाठी पडु द्यावा बुद्धीवर कितीही ताण.
जर झाली तर झाली त्यासाठी जगातुन अकस्मात बोळवण.

- संजय उदगीरकर.

DEMOCRACY
Thumb_1419576748
PO#284397
0
0
February 15, 2019
 

मी उगीचच.

मी उगीचच भीत होतो.
या आधी मी कितीदा तरी मेलो होतो.
जन्मलो होतो.
मेलो होतो.

मी उगीचच भीत होतो.
मी इथेच राहतो.
फार थोड्या वेळासाठी जातो.
शरीर बदललेले घालून येतो.

मी उगीचच भीत होतो.
सुखं आणी दुःख भोगतो.
काही तरी घडवतो.
काही तरी मोडतो.

मी उगीचच भीत होतो.
पाण्याच्या बुडबुड्या सारखा असतो.
दरवेळी आता इथेच रहायचे आहे असे समजतो.
आणी मग अचनक निघून जातो.

मी उगीचच भीत होतो.
गेल्यावर थोडक्यात परत येतो.
दरवेळी जुने तेच नवीन समजतो.
भोगलेले पुन्हा पुन्हा भोगतो.

मी उगीचच भीत होतो.
खोट्याला खरं समजतो.
भ्रमाला सत्य समजतो.
दरवेळी सत्य शोधायचे टाळतो.

मी उगीचच भीत होतो.
फक्त मीच असतो.
माझ्याशिवाय कोणी नसतो.
मीच माझ्यासाठी सर्व कांही होतो.

मी उगीचच भीत होतो.
माझे शेपुट मीच तोंडात धरायला ...

LOL
Thumb_1419576748
PO#284397
0
0
February 14, 2019
 

लिंबोणी.

लिंबाला घातले गोड पाणी.
लिंबाच्या झाडाची लींबोणी.
लिंबोणी पीवळी सोन्यावणी.
सापाच्या फण्यावरचा मणी.

लिंबोणी कडु ईखा वणी.
फुटली तर शेंबडावणी.
चिकट जणू गोंदावणी.
मानसाची बी हीच कहाणी.

दिसाया वरून गोजिरवाणी.
आतुन पेटल्या निखार्यावणी.
नाही कोणाचे बी इथे कोणी.
जग समद हाय एक न्हाणी.

जस उताराकडचं वाहतया पाणी.
पैशाची बी तीच हाय कहाणी.
भल्या भल्याची करती मवाळ वाणी.
आहे त्याच्याचं घरात जमा होते आणी.

माणसं जशी खुळखुळती नाणी.
सदैव करती आत्मस्तुती कंटाळवाणी.
दुध कमी आणी जास्त पाणी.
कंटाळात नाहीत अजाबात करताना उणीदुणी.

मानुस बी हाय जनु फाटक्या पतराळीवणी.
खाता बी येईना अन टाकाया बी येईना अशी गत खुळ्यावणी.
राब राब राबतया गाढावा वणी.
रक्ताचं करतया पाणी पाणी.

एकदिस समद इथचं टाकुन जायासणी.
ज...

LET'S FALL IN LOVE
Thumb_1419576748
PO#284397
1
0
February 14, 2019
 

प्रलय.

मी वाट पाहतो आहे.
कधी ना कधी माणूस पुन्हा माणूस होणार आहे.
मीच त्याला तयार केला आहे.
आज तोच माझ्या जीवावर उठला आहे.

मी वाट पाहतो आहे.
तो मलाच हुडकत आहे.
मी त्याच्या डोळ्यासमोर आहे.
बघायचे आहे की तो माझे काय करणार आहे.

मी वाट पाहतो आहे.
त्याला कोठे ठाऊक आहे.
की मी वैश्वानर आहे.
तो माझ्यातचं जळून राख होणार आहे.

मी वाट पाहतो आहे.
तो माझ्या सृष्टीला ओरबडात आहे.
लुबाडत आहे.
त्याला कोठे ठाऊक आहे की मी सर्व पहात आहे.

मी वाट पाहतो आहे.
मी पुन्हा नरसिंह होणार आहे.
या वेळेस मनुष्य जातीलाच मांडीवर घेणार आहे.
ती वेळ लवकरच येणार आहे. 

मी वाट पाहतो आहे.
मला आता कळाले आहे.
मी तयार केलेला माणूस अपूर्णच राहिला आहे.
जुना मानव खोडून नवा तयार करावा लागणार आहे.

मी आता तेच ...

LION
Thumb_1419576748
PO#284397
1
0
February 12, 2019
 

काय सांगू.

काय सांगू.

मित्र हे फक्त मित्र असतात.
ते पुर्व पुण्याईनेच मिळत असतात.
आपल्या भाग्यातले मिळत असतात.
वेचून मित्र मिळत नसतात.

वेचायचे असतात ते मित्र नसतात.
मित्रातले फक्त गुण पहायचे असतात.
अवगुण तर आपल्यातही खुप असतात.
मित्र पैशे देऊन मिळतं नसतात.

मित्र बाजारात मांडलेले नसतात.
आपल्या भाग्यात जेवढे मित्र असतात.
आपल्याला तेवढेच मित्र मिळतात.
मित्र तळहातावरल्या फोडासारखे जपायचे असतात.

मित्राचे दुःख मित्राच्या आधी आपण सोसायचे असतात.
मित्र घट्ट पकडून ठेवायचे असतात.
मित्र एकदा का हरवले की मिळतं नसतात.
मैत्रीच्या नात्याचे धागे फार कच्चे असतात.

मित्र म्हणजे डोळ्यातील बुभळे असतात.
छोटेसे कुस गेले तरी पाणावलेले होतात.
मित्र हे निस्वार्थ प्रेमाचे प्रतिक असतात.
कृष्णाला प्रेम...

LET'S FALL IN LOVE
Thumb_1419576748
PO#284397
1
0
February 11, 2019
 

पळस.

पळस गेलं कोकना.
तीन पान काय चुकना.

मानसाचं बी तसचं हायना.
किती बी सिकला तरी दुरगुन काई जाईना.

कुनाला बी चांगलं म्हनीना.
गप गुमानं राहीना.

ईंचवाचा मंतर येईना.
सापाच्या बिलात हातं घालायाचे काई सोडीना.

घरात खाया एक दाना पन नाहीना.
भरशाळ मोठंपनाचं बोलायचं काई सोडीना.

एक हात लाकूड अन दहा हात ढालपी हायना.
मंतर थोडा अन थुकाच जास्त हायना.

अक्कल कवडीची नाहीना.
जे कर म्हनलं ते करीना.

अंगातला फुकाचा मोठेपना काय जाईना.
शानपन शिकवायचं काई सोडीना.

लहान मोठं कायबी बघीना.
कुठंबी ज्ञान पाजळायाचं सोडीना.

कमवायची अक्कल नाहीना.
तमाशा बघायाचे सोडीना.

घरच्यांना ढुंकून बी ईचंरीना.
बाहेर शेन खायाचे सोडीना.

जा म्हनलं तिथ जाईना.
जिथं बसुबी नये तिथून उठना.

अवसेला जलमलाय की काय कळना.
बेनं कुनाच हाय का...

KISS KISS
Thumb_1419576748
PO#284397
1
0
February 9, 2019
 

आपल्याला.

आपल्याला.
हवे आहे कशाला.
कोणाचे जे मिळाले होते पहायला.
सारखे करू नये मला मला.
आळ घालावा आपल्या हावरटपणाला.
नाही तर जे दिसले त्याच्या मागे पळाला.
असे बिरूद लागेल आपल्या नावाला.
आपणच कारण होवू आपल्या हश्याला.
जो आहे इथे आला.
कालांतराने तो आहे पहा गेला.
पाहा काय बरोबर आहे घेऊन गेला.
निर्मळ ठेवा आपल्या थिल्लर मनाला.
लावू नक घोर मना मुळे जीवाला.
अंत नाही मनाच्या हव्यासाला.
फळ लागतं असते आपण केलेल्या कर्माला.
खावेचं लागते ते कर्म फळ आपणाला.
मोकाट सोडू नये वायु समान वासनेला.
निरंतर जवळ असू द्यावे समाधानाला.
विसरू नये कदापि नामस्मरणाला.
कमवायचेचं असेल काही तर कमवावे फक्त हरीला.
शांत ठेवावे मनाला.
आठवतं रहावे त्या पैलतीरला.
पार करावयाचे आहे सर्वांना त्या वैतरणीला.
थारा देऊ नये मनात शंक...

THINK OUTSIDE THE BOX
Thumb_1419576748
PO#284397
0
0
February 9, 2019
 

हिला.

हिला पाहून चंद्र पृथ्वीवर कोसळतो की काय
माझ्या प्रेयसीचे सौंदर्य बघून चंद्र वितळतो की काय
हिला लाटांशी खेळताना पाहून समुद्र कोरडा पडतो की काय
हिला बाहेर आलेला पाहून वारा वेडापिसा होतो की काय
अशी भीती सदोदित वाटतं असते.

हि उन्हात आली तर सूर्य विरघळून पृथ्वीवर गळतो की काय
नदी काठावर गेली तर नदी हिच्या दिशेने वाहती की काय
पाहणारे ध्यानी उन्मनी होतात की काय
पाहणारे मंत्रमुग्ध होऊन हिच्या मागे चालू लागतात की काय
अशी भीती सदोदित वाटतं असते.

हिला पाहून स्त्रियांना हलाहल पिल्या सारखा दाह होतो की काय
जिथे जाईल तिथे हिच्यामुळे वेडे झालेल्या लोकांची संख्या वाढते की काय
हिला सगळे पाहतात, ही पण कोणाला पाहील की काय
हिचे सौंदर्य कधी उतरणारच नाही की काय
अशी भीती सदोदित वाटतं असते.

स्वर्गातील अप...

THINK OUTSIDE THE BOX
Thumb_1419576748
PO#284397
0
0